मोदी सरकार हे गोरगरिबांच्या समस्या सोडवणारे सरकार

केंद्रीय गृहराज्यमंत्री केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी निरवडे ठिकाणी व्यक्त केले मत
विकसित भारत संकल्प यात्रा’सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात झाली दाखल
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’हा उपक्रम मोदी सरकारने राबवला आहे.विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जावून विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करणार आहे.कृषी, आरोग्य, महसूल यांसह इतर विभागांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी असणाऱ्या योजना गावागावात पोहचविण्यासाठी विकास यात्रारथ गावोगावी फिरणार आहे,.विकसित भारत संकल्प यात्रा’सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात दाखल झाली होती यांचे यात्रेचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या विकास रथाच्या माध्यमातून गावागावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार असून वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठीचे अर्जही भरून घेतले जाणार आहेत. लाभार्थ्यांच्या केवायसी संदर्भातील तसेच योजनांच्या बाबतीतील अडचणी व शंका यांचे निरसनही जागेवर केले जाणार आहे असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी निरवडे येथील कार्यक्रम वेळी मत व्यक्त केले.
.‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी सावंतवाडी तालुक्यांतील निरवडे येतील कार्यक्रम वेळी केले . आज शेतकरी प्रगत झाला तर राष्ट्र प्रगत होईल या उद्देशाने शासन विविध योजना राबवित आहे, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी युवकांसाठी बारा बलुतेदारांसाठी विविध योजना अमलात आणत आहेत त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या आणि जीवनमान सुधारा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अद्यापपर्यंत लाभ न मिळालेल्या व्यक्तींपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे या योजनांचे लाभ घ्या असेही आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रम वेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,जिल्हाधिकारी किशोर तावडे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसीलदार श्रीपाद पाटील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, विस्तार अधिकारी प्रशांत चव्हाण निरवडे सरपंचा सुहानी गावडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, पंकज पेडणेकर, प्रमोद गावडे,प्रियांका गावडे,अंगारिका गावडे,सदा गावडे, नारायण राणे,धर्माजी गावडे, संतोष गावडे,ग्रामविकास अधिकारी सुनिता कदम, आदेश जाधव,मधुसूदन गावडे,चंद्रकांत गावडे,नागेश गावडे, श्याम बर्डे,विनय गावडे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले पंतप्रधान मोदी हे सर्वसामान्य जनतेच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळें शेतकरी,युवा पिढीच्या सर्वागीण विकासासाठी आज आपला देश आत्मनिरभर झाला होत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी तालुका आणि निरवडे गावाला मंत्री मिश्रा यांनी भेट दिली. त्यामुळे मी त्यांचे स्वागत करतो. केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनाकडून विकसित भारत संकल्प यात्रा चे आयोजन करण्यात आले आहे योजनांची माहिती देणारी ही व्हॅन आज निरवडे गावात आली आहे. त्यामुळे येथील लोकांना योजनांची माहिती मिळवायची असेल तर ती माहिती घेण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे प्रत्येकाने माहिती करून घेऊन आपल्या जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे ,शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात आले आहे.मात्र ग्रामीण भागातील लोकांनी सुद्धा त्याचा लाभ घेतला पाहिजे कोणीही सुविधा पासून वंचित राहता कामा नये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना अमलात आणले आहेत शेतकरी प्रगत झाला तर राष्ट्र प्रगत होईल अशा उद्देशाने या योजना राबविण्यात येत आहेत आणि या ठिकाणी प्रत्येकाला सुविधा देण्यात येणार आहे.
यावेळी सरपंचा गावडे म्हणाले शासनाची योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे जीवनमान सुधारेल या उद्देशाने शासनाने विविध योजना राबविण्यात आले आहे निरवडे गावात या योजनांचा बऱ्याच जणांनी लाभ घेतला आहे मात्र पुढील काळात त लाभ न घेतलेले शेतकरी लाभ घेतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली तर या ठिकाणी बरेच युवक मैदानी खेळात उत्कृष्ट आहेत मात्र या ठिकाणी मैदान सुविधा उपलब्ध नसल्याने बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे त्यासाठी लागणारा निधी तुम्ही उपलब्ध करून द्या अशी मागणी ही त्याने मंत्री मिश्रा यांच्याकडे केली यावेळी मंत्री मिश्रा यांनी त्यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवत नक्कीच निधी देऊ असे आश्वासन दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले
निरवडे गावात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारी व्हॅन दाखल
भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ निरवडे गावात दाखल झाला आहे त्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे. यावेळी ग्रामीण भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, या 16 योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.
सावंतवाडी, प्रतिनिधी