भगवती माऊली चिंदर दिंडे जत्रा 26 डिसेंबर रोजी…!

ग्रामपंचायत, ग्रामस्थ, बारापाच यांची संयुक्त बैठक संपन्न
21 डिसेंबर रोजी व्यापारी नियोजन बैठक;व्यापारी वर्गाने उपस्थित राहावे -ग्रामपंचायत-बारापाच मानकरी यांचे आवाहन
नवसाला पावणारी हाकेला धावणारी म्हणून ख्याती असलेल्या, भक्तांचे श्रध्दास्थान मालवण तालुक्यातील चिंदर भगवती माऊलीची दिंडे जत्रा म्हणून प्रसिध्द असलेली यात्रा 26 डिसेंबर रोजी होणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी आज चिंदर ग्रामपंचायत, बारापाच मानकरी, देवस्थान कमिटी, ग्रामस्थ अशी बैठक सरपंच सौ. नम्रता महंकाळ(पालकर) यांच्या अध्यक्षतेखाली चिंदर ग्रामपंचायत येथे पार पडली. यावेळी यात्रा नियोजना बाबत विविध मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच 21 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता माऊली मंदिर येथे व्यापारी नियोजनासाठी बैठक घेण्याचे ठरवण्यात आले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, केदार परुळेकर, जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर, महेंद्र मांजरेकर, शशिकांत नाटेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन- देवेंद्र हडकर, भगवती देवस्थान कमिटी अध्यक्ष अरविंद घाडी, माजी सभापती हिमाली अमरे, मधुकर पाताडे, किशोर लिंगायत, पोलिस पाटील दिनेश पाताडे, मंगेश गांवकर, रविंद्र गोसावी, गजानन पाताडे, विवेक घाडगे, सरिता जंगले, प्रिया पालकर, दत्तात्रय घाडी, राजेंद्र पालकर, विठ्ठल पाताडे, सदानंद गोसावी, भाई अपराज तसेच ग्रामस्थ व शासकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
प्रतिनिधी, आचरा