कणकवली बाजारपेठेत मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

घराच्या छपराचे काम सुरू असताना सरी कापल्याचे घडले कारण

परस्पर विरोधी तक्रारी दाखल

कणकवली बाजारपेठेत घराच्या बाजूला काम सुरू असताना छपराची सरी कापली म्हणून विचारणा केली असता याचा राग आल्याने घराशेजारीच असलेले लक्ष्मीकांत सूर्यकांत चव्हाण (57) व त्यांचा मुलगा रविकांत लक्ष्मीकांत चव्हाण (31, दोन्ही बाजारपेठ कणकवली)यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नामानंद महादेव मोडक (58, रा. पटकीदेवी मंदिरा नजीक बाजारपेठ, कणकवली) यांनी फिर्याद दिली त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. तर नामानंद मोडक यांनी शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी लक्ष्मीकांत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नामानंद मोडक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना आज शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत नामानंद मोडक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, फिर्यादी असलेल्या नामानंद मोडक यांच्या बाजूला असलेल्या सलून च्या छपराचे काम करत असताना मोडक यांच्या घराच्या बाजूला येणारी लाकडी सरी कापण्यात आली. याबाबत नामानंद मोडक यांनी संशयितांना विचारणा केली असता त्याचा राग धरून लक्ष्मीकांत चव्हाण व त्यांचा मुलगा रविकांत चव्हाण यांनी नामानंद मोडक राहत असलेल्या ठिकाणी घरात जाऊन त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद नामानंद मोडक यांनी दिल्यानुसार संशयितांच्या विरोधात भा द वी कलम 452, 352, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी आपल्याला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली म्हणून लक्ष्मीकांत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नामानंद मोडक यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार विनोद सुपल करत आहेत.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!