ज्ञानतपस्वी माजी चेअरमन स्व .केशवरावजी राणे साहेब

कणकवली/मयुर ठाकूर

शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी चेअरमन स्व केशवरावजी राणे साहेब यांची आज15 डिसेंबर रोजी जयंती विद्यामंदिर माध्य प्रशालेत साजरी करण्यात आली . शिक्षणाविषयी अतोनात तळमळ असलेले राणे साहेब यांनी विद्यामंदिर माध्य प्रशाला1959 साली स्थापन करून कणकवली आणि ग्रामीण परिसरातील कष्टकरी जनतेच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. स्वतः शिक्षणाने संपन्न असलेले राणे साहेब नामवंत वकील होते . राजकीय क्षेत्रात देखिल आदर्श निर्माण करून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यचा कायापालट केला . शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली या संस्थेचे ‘ब्रिद सत्य मेव जयते ‘ या वचनानुसार राणे साहेब आयुष्यभर जगले . निष्ठा आणि बुद्धीमता यांची सांगड घालून शिक्षणाचा गांभिर्याने विचार करून सामान्य माणसांना जीवनांत मायेची उभारी दिली. शिक्षण तज्ञ ते स्वच्छ चारित्राचा राजकीय नेता या प्रतिमा उजळ माथ्याने साहेबांनी सांभाळली . आणि विद्यामंदिर प्रशाला नावारूपाला आणली . आजही राणे साहेबांच्या तत्वांचा आदर करुन प्रशालेची यशस्वी वाटचाल सुरु आहे . या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्ववेक्षिका सौ जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक श्री वणवे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

error: Content is protected !!