माजी आमदार केशवराव राणे यांची जयंती

कणकवली/मयुर ठाकूर

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन कै. केशवराव राणे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील अर्थशास्त्र विभागातील माजी प्राध्यापक डॉ.विजय ककडे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम, पर्यवेक्षक के. जी.जाधवर, श्री संजय ठाकूर उपस्थित होते.
या याप्रसंगी ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर डॉ. सोमनाथ कदम , के.जी.जाधवर यांनी केशवराव राणे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
प्रभारी प्राचार्य युवराज मलिंगी यांनी प्रास्ताविकातून केशवराव राणे साहेब यांच्या कार्याची संक्षिप्त ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीनाक्षी सावंत यांनी व आभार प्रदर्शन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. जी. गावडे यांनी केले.
या वेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!