कणकवली शहरातील अनधिकृत बॅनर वर होणार कारवाई!

नियमानुसार बॅनर लावण्यासाठी फी भरून परवानगी घ्या
मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन
अनधिकृत बॅनर द्वारे शहराचे होणारे विद्रूपीकरण टाळण्याकरिता अधिकृत बॅनर वर कणकवली नगरपंचायत कडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी नियमानुसार परवानगी घ्या व अटी, शर्ती चे पालन करावे असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. तसेच या लावण्यात येणाऱ्या बॅनर वर क्यूआर कोड असण्याची आवश्यकता आहे. यामुळे ही परवानगी केव्हा घेतली गेली ते स्पष्ट होणार आहे. असेही मुख्याधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.
कणकवली/ प्रतिनिधी





