शाळाबाह्य मुलांबाबत सरकारची माहिती खोटी

काॅग्रेस नेते मा.श्री बाळासाहेब थोरात यांनी मराठी शाळां बाबत सरकारच्या उदासीनता व लपवालपवी बाबत काल प्रश्नोत्तरे काळात विधानसभेत खडेबोल सुनावले. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा केला
॰ बालक सहा वर्षाचे झाल्यावर ते शाळेत आलं पाहिजे, शाळेत शिकलं पाहिजे आणि शाळेत टिकलं पाहिजे ही त्या कायद्याची भूमिका होती
॰ राज्य सरकार मात्र या कायद्याची अंमलबजावणी करत असताना सभागृहाला खोटी माहिती देत आहे
॰ राज्यात फक्त तीन हजार मुले शाळाबाह्य आहे हा आकडा कोणाला ही पटणार नाही
॰ नुसता मेळघाट तपासला तरी हजारो शाळाबाह्य मुले सापडतील, अनेक आदिवासी भागामध्ये शाळाबाह्य मुलांचे प्रमाण हजारोंच्या संख्येने आहे
॰ शासनाने ही बनवाबनवी बंद करून पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावे
नागपूर प्रतिनिधी