कलमठ युवासेनेच्या वतीने आरोग्य व रक्तदान शिबिर
कलमठ बाजारपेठ येथे आयोजन
कणकवली : युवासेना कलमठ विभागा च्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य व १८ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन कलमठ बाजारपेठ येथे करण्यात आले आहे.आरोग्य शिबिरात महिलांची थायरॉईड तपासणी, मधुमेह तपासणी, सीबीसी हिमोग्लोबिन तपासणी, कर्करोग रक्त तपासणी, कॅल्शियम तपासणी, रक्त तपासणी, करण्यात येणार आहे. तर 18 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. या माहितीसाठी धीरज मेस्त्री 8805831281, अनुप वारंग 9822361036, संकेत गुडेकर, राजू राठोड, रिमेश चव्हाण, सचिन खोचरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली