पद नसले तरी काम कसे करावे हे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडून अनुभवावे!

“एक दिवस छोट्यांसाठी” कार्यक्रमाचे दिमाखात उद्घाटन!
आमदार नितेश राणेंकडून माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे तोंड भरून कौतुक
चॉकलेटचा खजिना लुटण्यासाठी तोबा गर्दी
पद असो वा नसो सातत्याने जनतेमध्ये काम कसे करत राहावे हे कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडून अनुभवामुळे असे गौरवउद्गार काढत आमदार नितेश राणे यांनी एक दिवस छोट्या साठीचा कार्यक्रमाचा शुभारंभ केला. कणकवली माजी नगराध्यक्ष म्हटलं की त्यांची हटके स्टाईल व अनोखे उपक्रम नेहमीच चर्चेत व लोकप्रिय बनतात. गेले काही वर्ष माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हटके स्टाईल संकल्पनेतून राबविण्यात येत असलेला एक दिवस छोट्यांसाठी या उपक्रमाचे यावर्षी देखील कणकवलीतील गणपती साना या ठिकाणी मोठ्या तुडुंब गर्दीमध्ये आज शुभारंभ झाला. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. खाऊ गल्लीचा “खजिना” आमदार नितेश राणे यांनी चावी लावत उघडला आणि शेकडो मुले अक्षरशा या खजिन्यावर तुटून पडली. या खजिन्यांमध्ये असलेल्या चॉकलेट मध्ये तब्बल 25 बक्षिसे ठेवण्यात आली होती. हा या खजिना लुटताना भाग्यवान विजेते मुलांना देखील एक वेगळाच आनंद अनुभवताना या ठिकाणी पाहायला मिळाले. या हटके स्टाईल उद्घाटनाच्या कार्यक्रमामुळे देखील हा कार्यक्रम चर्चेचा विषय बनला. कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने कणकवलीतील गणपती सान्यावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवस छोट्यांसाठी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. टेंबवाडी रस्ता ते ते गणपती साण्यापर्यंत अवघा परिसर गर्दीने फुलून गेला होता. दरवेळी होणारी वाहतूक कोंडी रिंग रोड च्या कामामुळे काही प्रमाणात कमी झाली होती. अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल, छोट्यांसाठी विविध प्रकारची खेळणी, मिकी माऊस, या सोबतच सेल्फी पॉइंट व गाण्यांचा नजराणा व अनेक विविध उपक्रमांनी एक दिवस छोट्यांसाठीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यादगार ठरला. यावेळी रंगीबेरंगी कारंजा सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. जादूच्या प्रयोगाने तर चिमुकल्यांनी धमालच केली. कणकवली माजी नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये छोट्यांना पन्नास रुपयांचे कुपन देण्यात आले ते घेण्याकरिता रांगा लागल्या होत्या. सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगरसेवक राजश्री धुमाळे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक मेघा गांगण, अभिजीत मुसळे, मेघा सावंत, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, माजी नगरसेवक किशोर राणे, शिशिर परुळेकर, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, चारुदत्त साटम, बंडू गांगण, महेश सावंत, कविता राणे, रवींद्र गायकवाड, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, प्राची कर्पे, राजू गवाणकर, प्रसन्ना देसाई, राजा पाटकर, पंकज पेडणेकर, आदि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लागलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल व खेळांच्या ठिकाणी मुलांनी तुडुंब गर्दी केली होती. लहान मुलांची खेळणी ही तर एक लहान मुलांसाठी पर्वणी ठरली होती. लहान मुलांच्या झुंबडीसह त्यांचे पालक व युवकांची गर्दी देखील या कार्यक्रमात शोभा वाढवणारी ठरली. तर हातावर स्टॅचू काढून घेण्यासाठी देखील अनेकांनी गर्दी केली होती.
दिगंबर वालावलकर /कणकवली