नौसेनेचा नौदल दिन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण व भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मंत्री महोदय, अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.
दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या नौदल दिन कार्यक्रमाचे प्रात्याक्षिके 4 वाजलेपासून सुरु होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत प्रवेश सुरु राहणार आहे.
नागरिकांना कार्यक्रम बघण्याची व्यवस्था तारकर्ली व्यासपिठाच्या दक्षिणकडे तारकर्ली बीच देवबागकडे आणि उत्तरेकडे दांडी बीचकडे केली आहे. नागरिकांना वाहन पाकींगकरीता दांडी बीच ते मोरयाचा धोंडा, काळेथर मैदान व ग्रामपंचायत तारकर्लीच्या बाजूला सोय करण्यात आलेली आहे. कार्यक्रम सर्वाना पाहता यावा यासाठी कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यासाठी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते, नौदल दिन कार्यक्रम व नौसेना विभागाची प्रात्याक्षिके पाहण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच तारकर्ली मालवण येथे समुद्रकिनारी नौदल दिवस साजरा होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहताना मोठ्या बॅगा, मोठया पर्स, लहान मुले व वृध्द व्यक्ती सोबत आणू नये.
ब्युरो न्युज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग