गड नदीवरील केटी बंधाऱ्याला अडकलेली लाकडे हटवून प्लेट लावण्याचे काम सुरू

पाणी लिकेज राहता नये याची दक्षता घ्या!
वागदे सरपंच संदीप सावंत यांची मागणी
कणकवली शहरातील गड नदीवरील केटी बंधाऱ्यावर प्लेट घालण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आल्यानंतर, या बंधार्याला पावसाळ्यामध्ये पुरात लाकडे अडकून होती ती तशीच ठेवून या प्लेट लावण्याचे काम करण्यात येत होते. मात्र याबाबत वागदे चे सरपंच संदीप सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. जोपर्यंत ही बंधाऱ्याला अडकून राहिलेली लाकडे काढली जात नाहीत तोपर्यंत प्लेट लावण्याचे काम करू नये तसेच ज्या ठिकाणी प्लेट लावल्यावर पाणी लिकेज होते हे लिकेज टाळण्यासाठी दोन्ही बाजूला प्लेट लावून त्यामध्ये माती टाकण्याबाबतही उपाययोजना संदीप सावंत यांनी सुचवल्या. त्यावर शाखा अभियंता यांनी घटनास्थळी येत याबाबत कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच या प्लेट बसून होईपर्यंत संबंधित विभागाचा कर्मचारी येथे कार्यरत ठेवा अशी देखील मागणी श्री सावंत यांनी केली. गतवर्षी अशा प्रकारे प्लेट लावल्या गेल्या तरी या केटी बंधाऱ्याच्या वरील भागातील पाणी वाहून गेल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत होता. अखेर यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने हा त्रास भासू नये या दृष्टीने वागदे सरपंच संदीप सावंत यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शाखा अभियंत्याने दिल्याची माहिती श्री सावंत यांनी दिली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली