कणकवली महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

कणकवली/मयुर ठाकूर.
शि. प्र. मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली येथे आज दिनांक 28 नोव्हेबर 2023रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी ज्योतिबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य. युवराज महालिंगे उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी.जी.गावडे उपस्थित होते.प्रा.युवराज महालिंगे यांनी आपले मनोगत केले.प्रास्ताविक प्रा. हरिभाऊ भिसे भिसे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मारोती चव्हाण यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.