महापुरुष मंडळ पिंगुळी-शेटकरवाडीचा ३० ला रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा

विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील महापुरुष युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ शेटकरवाडी या मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा ३० नोव्हेंबरला साजरा होणार आहे. त्या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
रविवार दि. २६ नोव्हेंबर सकाळी १०.०० ते दु. १२.३० रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर, गुरुवार ३० नोव्हेंबर सकाळी १०.०० वा श्री सत्यनारायण महापुजा, सायं. ०६.०० ते ९:०० हरिपाठ व ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, रात्री. १०.०० वा. दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा नाटचप्रयोग शेषात्मज गणेश,
शनिवार दि. २ डिसेंबर २०२३ रोजी • संकाळी ९.०० से १२.०० वा.रक्तदान शिबिर आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन महापुरूष युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, शेटकरवाड़ी अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





