आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

लहान गटात तुळसाचा दिशम परब विजेता
ओंकार कला क्रीडा मंडळ पेंडूर-सातवायंगणी आयोजित दीपावली शोटाईम
प्रतिनिधी । कुडाळ : ओंकार कला क्रीडा मंडळ पेंडूर सातवायगणी ता वेंगुर्ले आयोजित दीपावली शो टाईम अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात पिंगुळीची मृणाल सावंत तर लहान गटात तुळसचा दिशम परब विजेते ठरले
ओंकार कला क्रीडा मंडळ पेंडूर सातवायगणीच्या वतीने दीपावली शो टाईम अंतर्गतआंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेसह मुले महिला व पुरुष यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे हे सोळावे वर्ष असून भव्य खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन मान्यवराच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी समाजसेवक देवा कांबळी, माजी पंचायत समिती सदस्य बाळु परब, मुख्याध्यापक श्री साळसकर, मंडळाचे अध्यक्ष निलेश वैद्य, मनोज वैद्य, ग्रामपंचायत सदस्य रंजना हर्जी, उत्तम वैद्य, काका सावंत मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्पर्धक आदी उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर जाहीर करण्यात आला. खुली एकेरी नृत्य स्पर्धा विजेती मृणाल सावंत, द्वितीय नेहा जाधव इन्सुली, तृतीय आस्था देवीदास गोवा, उतेजनार्थ ईशा गोडकर शिरोडा, लहान गट प्रथम दिशम परब, द्वितीय प्रज्ञा कुडव गोवा, तृतीय वैष्णवी मुनणकर केळूस, उतेजनार्थ स्वरा पावसकर यांनी मिळविले. विजेत्यांना खुला गट अनुक्रमे रु सात हजार, रु पाच हजार, रु तीन हजार, तर लहान गट अनुक्रमे रु पाच हजार, रु तीन हजार, रु दोन हजार, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. दोन्ही गटात एकुण 34स्पर्धक सहभागी झाले होते.
रांगोळी स्पर्धा मोठा गट प्रथम प्रज्योत हर्जी, द्वितीय वैशाली वैद्य, तृतीय रंजना हर्जी, लहान गट प्रथम स्नेहा वैद्य, द्वितीय आंचल वैद्य, तृतीय श्रेयस हर्जी यांनी मिळविला. संगीत खुर्ची मुलगे विजेता प्रमित हर्जी, उपविजेता निखिल नाईक, मुली विजेती सेजल वैद्य, उपविजेती साधना वैद्य, महिला विजेत्या श्रद्धा वैद्य, उपविजेत्या सिध्दी वैद्य, पैठणी विजेत्या सौ रूची शिरोडकर, उपविजेत्या सौ मीलन हर्जी, स्लो सायकल स्पर्धा विजेता महेश वैद्य, उपविजेता प्रज्योत हर्जी, स्लो मोटर सायकल विजेता सदाशिव नर्से, उपविजेता प्रमित हर्जी, आकाशकंदील प्रथम विजय वैद्य, द्वितीय प्रज्योत हर्जी, तृतीय उल्हास वैद्य, डोळे बंद ठेवून नारळ फोडणे विजेता निलेश वैद्य, संगीत खुर्ची विजेती गौरी वैद्य, उपविजेती स्वप्नाली नर्से, पुरुष विजेता संपत नर्से, उपविजेता हनुमंत वैद्य, यांनी मिळवला सर्व स्पर्धांचे परीक्षण मिताली मातोंडकर सिध्देश परब गोवा महेंद्र मातोंडकर मातोंड यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





