ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्र तंदुरुस्त करणे काळाची गरज – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

पालकमंत्र्यांच्या हस्ते फिनिक्स हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागाचा शुभारंभ
ब्युरो । कणकवली : ग्रामीण भागातील वैद्यकिय क्षेत्र तंदुरुस्त करणे काळाची गरज आहे .हे वैद्यकीय क्षेत्र तंदुरुस्त करण्यासाठी डॉ शरणसारख्या असंख्य युवा डॉक्टरांची जिल्हयाला गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी रात्री केले
कणकवली येथे फिनिक्स मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू झाले असून या ठिकाणी असणाऱ्या अद्ययावत शस्त्रक्रिया विभागाचा शुभारंभ शनिवारी रात्री पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतूल काळसेकर, जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे, माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, व्यवस्थापकीय संचालिका प्राची चव्हाण, डॉ पावसकर, डॉ विद्याधर तायशेटे, डॉ शरण चव्हाण, डॉ मिलिंद कुलकर्णी, अशोक करंबेळकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, के टी चव्हाण, रघुनाथ चव्हाण, सी आर चव्हाण ,पांग्रड सरपंच कावेरी चव्हाण, संतोष कानडे, विष्णू खोबरेकर, नामदेव जाधव, जयप्रकाश प्रभू, प्रतिक्षा सावंत, प्रसाद पोईपकर, प्रकाश वाघेरकर,अण्णा कोदे ,जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले वैद्यकीय क्षेत्रात पदवी घेऊन वाटचाल करणारे डॉक्टर्स हे मुंबई पुणे अन्य मोठ्या शहरातील हॉस्पिटलकडे वळतात मात्र डॉ शरण चव्हाण यांनी आपल्याच लाल मातीत ही सेवा सुरू करून सर्वसामान्यांसाठी सेवा देण्यासाठी कटिबद्ध झाले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीत कुडाळ पंचायत समितीने सातत्याने विविध राज्य पुरस्कारात यशाची दैदिप्यमान वाटचाल सुरू ठेवली नुकताच या पंचायत समितीला महाआवास योजनामध्ये केंद्र पुरस्कृत राज्य पातळीवर प्रथम तर रमाईमध्ये राज्यात दुसरा पुरस्कार मिळाला आहे हे कौतुकास्पद आहे. आता वैद्यकिय क्षेत्रात वाटचाल करताना डॉ शरण व त्यांची टीम निश्चितच या आरोग्य क्षेत्रात मानवसेवा समजून कार्यरत राहतील सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या भविष्यातील आपल्या देशातील ग्रामीण भागातील वैद्यकिय क्षेत्र कसे असावे या त्यांच्या विचाराना अनुसरून ग्रामीण भागात डॉ शरण यांनी जी रुग्णसेवा सुरू केली ती निश्चितच भविष्यात त्याला पद्म पुरस्कार मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे देशात, जगात काय चालले त्यापेक्षा ग्रामीण भागात एखादा तरुण कसा काम करतो ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा आत्मसात करून वाटचाल करण्याचे काम डॉ शरण सारखा तरुण करत आहे जिल्ह्यात असे युवा या दिशेने वाटचाल करतील आणि पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करतील असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले
यावेळी सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अक्षरसिंधूचे अध्यक्ष संजय राणे, मयूर चव्हाण,नाट्य कलाकार तसेच नृत्यक्षेत्रात कथक विशारद पदवी प्राप्त नृत्यांगना मृणाल सावंत यांचा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन के टी चव्हाण यांनी केले सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार डॉ शरण चव्हाण यांनी केले.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कणकवली.





