गिरणी कामगार आणि वारसदारांसाठी कुडाळमध्ये उद्या (२६) बैठकीचे आयोजन

प्रतिनिधी | कुडाळ : गिरणी कामगार व वारसदार न्याय हक्क संघटना यांच्याकडून जिल्हास्तरीय कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे कुडाळ येथे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10.30 ही बैठक कुडाळ मध्ये होणार आहे. यावेळी ज्या गिरणी कामगार /वारसदार, यांना नव्याने फॉर्म भरायचा असेल, त्यांचे फॉर्म ” विनाशुल्क ” भरून घेतले जातील. अशी माहिती निमंत्रक व समन्वयक सौ. रश्मी राजेंद्र लुडबे. अधिक माहितीसाठी 9421638287 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!