तोंडवली बावशी उपसरपंच पदी भाजपचे दिनेश कांडर बिनविरोध

नवनिर्वाचित उपसरपंचांचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत
कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी बावशी येथील दिनेश कांडर यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तत्कालीन उपसरपंच अशोक बोभाटे यांनी आपले अडीच वर्षाच्या कालावधीनंतर राजीनामा दिला होता या रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक आज तोंडवली बावशी ग्रामपंचायत येथे संपन्न झाली. दिनेश कांडर यांच्या उपसरपंच पदी निवडी नंतर त्यांचे तोंडवली बावशी परिसरातून अभिनंदन केले जात आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई तोंडवली – बावशी सरपंच मनाली गुरव नांदगाव सरपंच भाई मोरजकर, कलमाड उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे , ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बोभाटे ,गौरवी बोभाटे ,सुभाष नार्वेकर विलास कांडर ,संतोष मिराशी, प्रल्हाद कुडतरकर श्री राणे गंगाधर बोभाटे तसेच ग्रामसेवक चव्हाण आदी उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी





