कुर्लादेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न
भाविकांमध्ये मोठा उत्साह
कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्लादेवी मातेच्या जिर्णोद्वाराचे, काम कुरली गावचे सुपुत्र उद्योगपती श्री दीपक दत्ताराम कदम. आणि सौ दिपाली दीपक कदम. यांनी आपला सुपुत्र, कै. कुमार सोहम दीपक कदम. याच्या स्मरणार्थ संपूर्ण मंदिराचे काम स्वखर्चाने करून दिले. सदर मंदिराचे लोकार्पण, आज दिनांक 20 /11 /2023 रोजी उद्योगपती दीपक दत्ताराम कदम. व कुरली गावचे सुपुत्र श्री अनंत गंगाराम पिळणकर. यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री कुर्लादेवी मंदिराचे मानकरी, श्री बंडू पाटील. श्री कृष्णा पाटील. श्री संतोष कदम. श्री अरुण पवार. श्री रमेश पवार. श्री रमेश पाटील. श्री अनिल पाटील. श्री प्रकाश सावंत, श्री भास्कर पाटील, सत्यवान सुतार, दत्तगुरु पिळणकर, तसेच श्री उद्योगपती दीपक कदम यांचे मुंबईतील मित्र विलास वाघराळकर साहेब, श्री सूर्यकांत रावले, श्री प्रवीण भोसले, श्री मनोहर नारकर, श्री विवेक कदम. व गावातील ज्येष्ठ नागरिक, लहान थोर सर्व मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, व आज 20/ 11/ 2023 रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता नाना महाराज कदम जिल्हा बीड यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दिनांक 22 /11/ 2023 रोजी माननीय उद्योगपती श्री दीपक दत्तराम कदम, यांच्या हस्ते व कलशारण सोहळा गगनगिरी महाराजांचे शिष्य दीपक महाराज .यांच्या हस्ते होणार आहे. कलशारोहण सोहळा, व कुर्ला देवीची प्रतिष्ठापना पूजा होणार आहे.
कणकवली, प्रतिनिधी