गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नेहा जाधव व काव्या गावडे विजेत्या

गांगोवाडी मर्यादित पाककला स्पर्धेत प्रिया चव्हाण प्रथम

गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित ‘दीपोत्सव २०२३’ निमित्त जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा व गांगोवडी मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
पाककला स्पर्धेचा शुभारंभ राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. तांदळापासून बनवलेले पारंपरिक पदार्थ ही थीम ठेवण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिया चव्हाण, द्वितीय निधी पाटणे, तृतीय प्राजक्ता राणे, उत्तेजनार्थ आर्या राणे, सुजाता मांजरेकर यांनी पटकावला. या स्पर्धेचे परीक्षण आरती वायंगणकर यांनी केले.
यानंतर जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते राजेश मसुरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सुवर्णकार दादा बेलवलकर, रामदास मांजरेकर, परेश परब, सुभाष जाधव, शितल मांजरेकर, चानी जाधव, निधी गोवेकर, आनंद नाईक, सूर्यकांत जाधव, रेखा गावडे, राखी गिरकर, गायत्री परुळेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे: मोठा गट प्रथम क्रमांक नेहा जाधव, द्वितीय मृणाल सावंत, तृतीय नंदिनी बिले, उत्तेजनार्थ पूर्वा मेस्त्री, प्रेयश पवार यांनी पटकावला. मोठ्या गटात १३ स्पर्धक सहभागी झाले.
छोटा गट प्रथम क्रमांक काव्या गावडे, द्वितीय हेमांगी जाधव, तृतीय निधी खडपकर, उत्तेजनार्थ शिरीन खान, सृष्टी पवार यांनी पटकावला. या मध्ये १५ स्पर्धक सहभागी झाले.
विशेष लक्षवेधी डान्स म्हणून रमाकांत जाधव, दीक्षा नाईक, कनका परुळेकर यांना राजेश मसुरकर यांनी विशेष पारितोषिक कै.सुरेश मसुरकर, भार्गव मसुरकर, बाळकृष्ण मसुरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आली. तसेच दोन्ही मोठ्या व छोट्या गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कै.भालचंद्र मसुरकर व चारुशीला मसुरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आली. तसेच सर्व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक गांगेश्वर मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण संतोष पेटकर व संजय कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, भूषण परूळेकर, जय शेट्ये, निलेश गोवेकर, शेखर चव्हाण, माजी नगरसेविका माही परूळेकर, मृणाल परुळेकर यांचे योगदान लाभले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते परेश परब, चानी जाधव, सागर राणे, योगेश जाधव, रोशन जाधव, राहुल वालावलकर, मनीष गिरकर, अमित जाधव, रोहित जाधव, गणेश गावडे, प्रवीण मांजरेकर, प्रथमेश जाधव आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!