साई कला क्रीडा मंडळ नाबारवाडी आणि श्रेया गवंडे यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

रेकॉर्डडान्स सह विविध स्पर्धांचे आयोजन

रोहन नाईक । कुडाळ : साई कला क्रीडा मंडळ नाबरवाडी व नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सावाची रुपरेखा खालीलप्रमाणे असणार आहे.
सकाळी ९ वाजता शिवज्योतीचे आगमन
सकाळी १० वाजता शिवप्रतीमेचे पूजन
दुपारी 3 वाजता मुलांसाठी क्रिडा स्पर्धा
सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी खेळ
सायंकाळी ७ वाजता रेकॉर्ड डांस स्पर्धा

दुपारी होणारया मुलांच्या क्रिडा स्पर्धेमध्ये २ गट असणार आहेत. लहान गट (४ ते ८ वर्ष )
मोठा गट ( ८ ते १४ वर्ष)

तसेच रेकॉर्ड डांस स्पर्धेत ही दोन गट असणार आहेत
रेकॉर्ड डांस स्पर्धेचे बक्षीस –
मोठा गट – (१६ वर्षापुढील)
प्रथम क्रमांक – रु. ३०००/-
द्वितीय क्रमांक – रु. २०००/-
तृतीय क्रमांक – रु. १०००/-

लहान गट- १५ वर्ष पुर्ण व त्याखालील
प्रथम क्रमांक – रु. २०००/-
द्वितीय क्रमांक – रु. १५००/-
तृतीय क्रमांक – रु. ५००/-

या स्पर्धांसाठी स्पर्धकांनी आपली नावे ८७६७४३६३९३ / ८८५५००८४६४ / ९४२०७४११४९/ ९४०४७४९९१५ या क्रमांकावर संपर्क करुन द्यावीत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी शिवजयंती सोहळ्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन साई कला क्रिडा मंडळ व नगरसेविका सौ. श्रेया गवंडे यांनी केले आहे.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!