व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
दुसऱ्या सामन्यात राजाराम वॉरियर्स तळवडे ९ गड्यांनी विजयी.
राजाराम वॉरियर्स तळवडे आणि सिंधुदुर्ग पोलीस यां संघात झाली रंगतदार स्पर्धा
दर्शन बांदेकर ठरले मॅन ऑफ द मॅच
मालवण : व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३ ही राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बोर्डिंग क्रिकेट ग्राउंड मालवण येथे सुरु असून ही स्पर्धा पाच दिवस चालणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरून संघ सहभागी झाले आहेत.यां स्पर्धेचा दुसरा सामना नुकताच संपन्न झाला.राजाराम वॉरियर्स तळवडे आणि सिंधुदुर्ग पोलीस यां संघांमध्ये ही स्पर्धा झाली यामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे हा संघ विजेता संघ म्हणून घोषित झाला तर दर्शन बांदेकर हे मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग पोलीस यां संघाने 48 रन्स केले होते त्यावर मात करत एक गडी बाद आणि 9 गडी राखत 49 रन्स करीत राजाराम वॉरियर्स तळवडे हा संघ विजयी झाला. विजयी संघाच अभिनंदन करण्यात आले आहे.
कोकणातील नामवंत स्पर्धा म्हणून म्हणून ओळख असलेल्या यां स्पर्धेच प्रथम पारितोषिक 2 लाख 51 हजार आणि आकर्षक चषक तसेच द्वितीय पारितोषिक 1 लाख 25 हजार आणि आकर्षक चषक तसेच तृतीय पारितोषिक 25 हजार आणि आकर्षण चषक तसेच अश्या अनेक विविध पारितोशीक देण्यात yenar आहेत.
मयूर ठाकूर / कोकण नाऊ / मालवण