कणकवली मतदारसंघातील रामभक्तांना मिळणार अयोध्या वारीची संधी

आमदार नितेश राणे यांची माहिती
कणकवलीतून सुटणार अयोध्या साठी दोन रेल्वे
कणकवली मतदारसंघातील रामभक्तांना अयोध्येला जाण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून दोन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. कणकवली रेल्वे स्टेशन वरून या दोन रेल्वे सुटणार असून त्याची तारीख वेळ लवकरच जाहीर केली जाणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या मुळे मतदार संघातील रामभक्तांना थेट नव्याने उभारणी करण्यात आलेल्या राम मंदिराची याची देही, याची डोळा अनुभूती घेता येणार आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली





