कणकवली,टेंबवाडी येथे १३ रोजी ‘स्वरगंध’ संगीत मैफील!

नागेश्वर मित्रमंडळाचे आयोजन

कणकवली, टेंबवाडी येथील नागेश्वर मित्रमंडळाच्यावतीने
दिपावली निमित्त १३ नोव्हेंबर रोजी आदर्श संगीत विद्यालय प्रस्तुत ‘स्वरगंध’ ही संगीत मैफील आयोजित करण्यात आली आहे.
कणकवली,टेंबवाडी येथील नागेश्वर मंदिरासमोर सायंकाळी ७.०० ते ९.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित या कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित श्रोत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
दरवर्षी कणकवली, टेंबवाडी येथे नागेश्वर मित्रमंडळ विविध समजोपयोगी उपक्रम राबवित असते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभत असतो. नवोदित कलाकारांना तसेच खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी क्रीडा तसेच अन्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. दिवाळी हा सण आनंद, उत्साह घेऊन येतो. त्यामुळे
यावर्षी दिवाळीनिमित्त संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्वरमैफिलीमध्ये आदर्श संगीत विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी कलाकार नाट्यगीत, भावगीत, गझल व सुमधुर भक्तीगीते सादर करणार आहेत. आदर्श संगीत विद्यालयाच्या संचालिका तेजस्विता संदीप पेंडूरकर यांचे या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन लाभले असून संचालक संगीत अलंकार संदीप पेंडूरकर यांचे संगीत संयोजन आहे. वेदांत कुयेस्कर, श्रीधर पाचंगे, अमित पांचाळ यांची संगीत साथ या कार्यक्रमाला लागणार आहे.तर प्रसिद्ध ध्वनी संयोजक नाना डंबे हे ध्वनी संयोजन करणार आहेत .या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन नागेश्वर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!