हुमरमळा (वालावल) बंगेनी गड राखला पण ग्रा. पं.मध्ये भाजपची एन्ट्री

सरपंचपदी उबठाचे अमृत देसाई
चिट्ठीचा कौल भाजप सदस्याच्या बाजूने
निलेश जोशी । कुडाळ : हुमरमळा-वालावल या ग्रामपंचायतीमध्ये गेले कित्येक वर्ष उबाठा सेनेची एक हाती सत्ता होती. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत मात्र भाजपने एन्ट्री केली आहे. असे असले तरी उबाठा सेनेचे अतुल बंगे यांनी हा गड राखला आहे.
सरपंच पदाची निवडणूक अटीतटीची झाली यामध्ये शिवसेनेच्या अमृत देसाई यांना ३५६ तर भाजपच्या कृष्णा परब यांना २९२ मते मिळाली. यामध्ये अमृत देसाई यांचा ६४ मतांनी विजयी झाला. त्यामध्ये तीन ग्रामपंचायत सदस्य भाजपची निवडून आले. प्रभाग १ मध्ये वीरेंद्र सावंत (१५७ मते विजय), संदेश जाधव (१४७ मते), नोटा १ मत, हेमांगी कद्रेकर (१६३ मते विजय), प्रणिता परब (१५२ मते विजयी), सोनाली देसाई (१३९ मते) प्रतीक्षा परब (१४८ मते) नोट ४ मते. प्रभाग २ मध्ये मितेश वालावलकर (१२० मते विजय), प्रशांत पारकर (८१ मते), नोटा २ मते, संजना गुंजकर (११७ मते विजय), समीक्षा परब (८४ मते), नोटा २ मते, प्रभाग ३ मध्ये ऋषिकेश उपाध्ये व सतीश मांजरेकर यांना ७३ मते मिळाली. समान मते मिळाल्यामुळे पाच वर्षीय चिन्मय गोसावी या विद्यार्थ्याकडून चिठ्ठीद्वारे विजय जाहीर करण्यात आला. यामध्ये भाजपचे ऋषिकेश उपाध्ये हे विजयी झाले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.