मनसे लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सोलर लाईट चे लोकार्पण

माणगाव खोऱ्यातील चाफेली गावात मनसे माजी उपतालुकाप्रमुख सत्यविजय कविटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण.

माणगाव :– मनसे लोटरी सेना अध्यक्ष मा. गणेश कदम यांच्या वाढदिवसाच अवचित्य साधून सत्यविजय कविटकर यांच्या उपस्थितीत आज चाफेली देऊळ वाडी श्री.लिंगेश्वर मंदिर येथे आज सोलर स्ट्रीट लाईट लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी ग्रामस्थानमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी गणेश कदम यांच्या माध्यमातून ह. नेरूर येथे देखील सोलर लाईट चे लोकार्पण करण्यात आले होते. आज चाफेलि देऊळ वाडी श्री.लिंगेश्वर मंदिर येथे आज सोलर स्ट्रीट लाईट लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मनसे चे माजी कुडाळ उप तालुका प्रमुख श्री.सत्यविजय कवीटकर यांच्यासह सदर कार्यक्रमात चाफेली तील श्री. पूनाजी परब , सुधीर गुंजाळ ,रितेश परब , रामचंद्र चाळके, अनाजी सावंत , सूर्यकांत देवळी, प्रविण सुद इ. ग्रामस्थ उपस्थित होते श्री. सुधीर गुंजाळ यांनी गावाच्या वतीने मनसे लॉटरी सेना अध्यक्ष श्री. गणेश कदम तसेच श्री.सत्यविजय कवीटकर यांचे आभार मानले.

error: Content is protected !!