युवतीवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न!

एकतर्फी प्रेमातून आत्महत्येसाठी मारली नदीपात्रात उडी
नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून घडला प्रकार
कणकवली शहरातील एका युवतीवर पेट्रोल ओतून तिला एकतर्फी प्रेमातून जाळण्याचा प्रयत्न तालुक्यातील एका गावातील युवकाकडून करण्यात आला. शनिवारी सकाळी कणकवली शहरात ही घटना घडली. यानंतर त्या युवकांने आपल्या हातावर धारदार हत्याराने वारही करून घेतल्याचे समजते. व त्यानंतर तेथून जात गणपती साना येथे नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कणकवली शहरात आज सकाळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एका भागात राहणाऱ्या युवतीवर एकतर्फी प्रेमातून जाळण्याचा प्रयत्न केला. त्या युवतीने त्या युवकाचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने त्या रागातून या युवकाने हा प्रकार केल्याचे समजते. त्या युवकाने आज सकाळी त्या युवती चे घर गाठत तिच्या घराजवळ हा प्रकार केल्यानंतर आसपासच्या लोकांनी धावाधाव केल्यावर या युवकाने तिथून पळत जात गणपती साण्या वरून उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.
दिगंबर वालावलकर/ कणकवली