जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्गनगरीत-जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस् यांची माहिती.

कणकवली/मयुर ठाकूर
युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे अयोजन करण्यात येते. राज्यात सन 2023-24 या वर्षातील युवा महात्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.
युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो.
संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 घोषित केलेले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी “1. तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर 2. सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ” ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2023-24 मध्ये दि.23 नोव्हेंबर 2023 रोजी स.09.00 वाजता जिल्हा नियोजन समिती हॉल (नवीन) सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येणार आहे.
युवा महोत्सवामध्ये खालीलप्रमाणे स्पर्धात्मक बाबींचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवाची नियमावली सोबत दिलेल्या गुगल लिंकवर देण्यात आलेली असून युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी गुगल लिंक फॉर्ममध्ये भरण्यात याव्यात.
https://docs.google.com/forms/d/1oXFJzD6odlee5HvrNJbtD3Uwy3eDYbxUXs7nHXX99y8/edit
- सांस्कृतिक – समुह लोकनृत्य , वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत ,
- कौशल्य विकास – कथा लेखन, पोस्टर स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी ) फोटोग्राफी,
- संकल्पना आधरित स्पर्धा – महाराष्ट्र राज्यासाठी 1. तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर 2. सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान
- युवा कृती – हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲगो प्रोडक्ट तसेच जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी स्पर्धापुर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी. तसेच सहभागाबाबत गुगल लिंकवर दि.20/11/2023 पर्यंत भरण्यात यावे. जिल्ह्यातील कनिष्ठ / वरिष्ठ महाविद्यालयातील व कृषी महाविद्यालयातील जास्तीत जास्त युवक – युवती / संघांनी,महिला मंडळ यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस यांनी केले आहे.