मनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण द्या!

आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणा देणारे असून समाजासाठी त्यांचे जीवन खूप मौल्यवान असल्यामुळे त्यांना शासनातर्फे त्वरित पोलिसांची सुरक्षा देण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली