म्हापसेकर तिठा ते एमआयडीसी मोरेश्वर हॉटेल मार्गाची दुरुस्ती होणार
सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी राजन चव्हाण यांचे आश्वासन
कुडाळ : म्हापसेकर तिठा ते एमआयडीसी मोरेश्वर हॉटेल या मार्गाची दुरुस्ती मागील अनेक वर्षे रखडली होती. याबाबत नेरूर आणि पिंगुळीवासियांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार सुद्धा केला. परंतु, या मार्गाची दुरूस्ती केवळ कागदावरच राहिली. याबाबत, पुन्हा सोमवार, १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळचे सहायक अभियंता यांची नेरूर आणि पिंगुळीवासियांनी बेहत घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्याची लेखी विनंती केली.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी राजन चव्हाण यांनी म्हापसेकर तिठा ते एमआयडीसी मोरेश्वर हॉटेलपर्यंत मार्गाचे काम पूर्ण करून देतो असे आश्वासन दिले. यावेळी नेरूर आणि पिंगुळीवासियांनी डेप्युटी राजन चव्हाण यांचे आभार मानले. त्यावेळी ओबीसी शिवसेना जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, माजी सदस्य प्रसाद गावडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे, जगन्नाथ गावडे, अजित मार्गी, रामा कांबळी, शंभूराजे नाईक आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ