आचरा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला

उमेदवारांचा घरोघरी प्रचारावर भर

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवार पाच नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.यात भाजप शिवसेना पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनलने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवड केली जाणार आहे.सरपंच पदासह तेरा सदस्यांसाठी हि निवडणूक होत आहे. सरपंच पदासाठी तीन उमेदवार नशिब अजमावत आहेत .यात खरी लढत भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यात होणार आहे.यात भाजप शिवसेना पुरस्कृत पॅनलचे जेराॅन फर्नांडिस आणि उबाठा शिवसेनेचे मंगेश टेमकर यांच्या मध्ये चुरशीच्या लढतीची शक्यता वर्तवली जातं आहे.दोन्ही बाजूंनी प्रचाराला जोर चढला आहे. सध्या शेती हंगाम भात कापणी मुळे शेतकरी शेतात असल्याने मतदारांच्या भेटीगाठी साठी जास्त करून सायंकाळची वेळ उमेदवारांना निवडावी लागत आहे. सोमवार पासून भाजप सेना पुरस्कृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.सकाळपासूनच प्रभाग एक हिर्लेवाडी पिरावाडी,प्रभाग चार मध्ये देवूळवाडी, प्रभाग पाच मध्ये वरचीवाडी,भंडारवाडी येथे भाजप शिवसेना पुरस्कृत उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत मतदारांच्या घरोघरी भेटी घेत प्रचार सुरू केला होता.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!