कणकवलीत गडनदी वर लवकरच प्लेट टाकून पाणी आडवा

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांची तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी
कणकवली येथील विहिरीच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. या बाबत वेळीच संबंधितांनी उपाययोजना करावी. त्याकरिता आता मागील वर्षी सारखी परिस्थिती येऊ नये, म्हणून येत्या महिनाभरातच गड नदी ला असणाऱ्या बंधाऱ्याला पाणी अडवण्यासाठी लोखंडी च्या प्लेट बसविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जानवली नदीच्या पात्रात सुध्दा, जो माती, दगड रचून पावसाळा संपल्यानंतर बंधारा केला जातो, तो पण होणे आवश्यक आहे.
अन्यथा कणकवलीकरांवर पाण्यासाठी मागील वर्षा सारखी वणवण फिरण्याची वेळ येऊ शकते. आणि म्हणूनच संबंधित प्रशासनाला आमची विनंती आहे.
संबंधित प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी आणि आम्ही कणकवलीकरांवर येणारे पाण्याचे संकट निवारण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.