सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेत संजय घोडावत स्कूल चॅम्पियन

जयसिंगपूर – संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सन 2023 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धा दि 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल जनरल चॅम्पियन ठरले. द्वितीय क्रमांक नेव्ही चिल्ड्रन स्कूल, गोवा व तृतीय क्रमांक न्यू हॉरीझोन स्कूल, नवी मुंबई यांनी प्राप्त केला. संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे रजिस्टर डॉ. विवेक कायंदे, संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती, सीबीएसई निरीक्षक श्री प्रमोद पाटील, सीबीएसई टेक्निकल ऑफिसर श्री बाहुबली चौगुला, क्रीडा संचालक के एल ई युनिव्हर्सिटी डॉ गुरुराज पुराणिक यांच्या उपस्थित बक्षीस समारंभ पार पडला. महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दिव दमन येथील 150 पेक्षा अधिक सीबीएसई शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आहेत. 1500 पेक्षा अधिक खेळाडू 14, 17 व 19 या वयोगटातील विविध ॲथलेटिक खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
वैयक्तिक चॅम्पियन विद्यार्थी
14 वर्षे गट मुले – आयुष पाटील (श्री मा विद्यालय, ठाणे)
14 वर्षे गट मुली – वेंकटा सरांनू (एम एन आर स्कूल ऑफ एक्सलन्स, नवी मुंबई)
17 वर्ष गट मुले – अविनाश गुड्डे (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, पुणे)
17 वर्षे गट मुली – यशश्री संकपाळ (मेमोरियल स्कूल, पुणे) रेशम चव्हाण (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर)
19 वर्षे गट मुली – खुशबू बागेल (जिंदाल विद्यामंदिर, ठाणे)
19 वर्षे गट मुले – अथर्व नलवडे, अभिषेक शिंत्रे ( संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल,कोल्हापूर) अनन्य सिंग (नेव्ही चिल्ड्रन स्कूल, गोवा)
या बक्षीस समारंभ प्रसंगी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन, उपप्राचार्य श्री अस्कर अली, उपप्राचार्य अर्चना पाटील उपप्राचार्य शोभा नवीन सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. चेअरमन श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले व संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांनी या क्लस्टर स्पर्धेमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!