ऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

रंगभूमी दिनाचे औचित्य

एसके प्रोडक्शन हाऊस कुडाळ यांचा उपक्रम

निलेश जोशी । कुडाळ : दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिवस साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून एसके प्रोडक्शन हाऊस कुडाळ यांच्या वतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा या नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दि. ३० ऑक्टोबर पूर्वी आपले व्हिडीओ दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठ्वावतेत असे आवाहन एसके प्रोडक्शन हाऊस कुडाळचे सचिन कोंडसकर यांनी केले आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन स्वरूपाची आहे. जगभरातील कोणताही स्पर्धक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. या स्पर्धेत प्रवेशमूल्य १०० रुपये असणार आहे . स्पर्धकाचे वय हे कमीतकमी १५ वर्षे असणे आवश्यक आहे. स्पर्धकाने पाठवलेला व्हिडीओ हा मराठी किंवा बोलीभाषेत असावा. व्हिडीओची मर्यादा कमीतकमी ५ मिनिटे व जास्तीत जास्त ६ मिनिटे असावी. व्हिडीओ कोणत्याही प्रकारे एडिट केलेला नसावा. व्हिडीओ हा लँडस्केप मोड मध्ये करावा व्हिडीओ करण्यासाठी एकच मोबाईल कॅमेरा वापरावा. विजेता हा परिक्षकांचे मूल्यांकन यावर ठरवला जाईल. व्हिडीओ डॉक्यूमेंट पध्दतीने, व्हॉट्सऍप क्रमांक 99755 52412, ईमेलवर (skproductionhousekudal@gmail.com) किंवा ड्राईव्हला पाठवणे बंधनकारक आहे. व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारिख ही ३० ऑक्टोबर २०२३ असणार आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्व व्हिडिओ एकाच दिवशी Unseen Konkan या यूट्यूब चॅनल ला पोस्ट केले जातील . या स्पर्धेचा निकाल ५ नोव्हेंबर २०२३ रोजी Unseen Konkan या इंस्टाग्राम पेज वरून संध्याकाळी ५ वाजता लाईव्ह सांगितला जाईल.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तरी सर्व स्पर्धकांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन sk production house चे संस्थापक सचिन कोंडस्कर यांनी केले आहे.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!