संजय घोडावत स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन

जयसिंगपूर (प्रतिनिधी) – संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सन 2023 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन दि 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर यादरम्यान करण्यात आले आहे. सलग 8 व्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला मिळाला आहे. महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दिव दमन येथील 150 पेक्षा अधिक सीबीएसई शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. 1500 पेक्षा अधिक खेळाडूंची नाव नोंदणी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत बोलताना संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती म्हणाल्या, उत्कृष्ट नियोजनामुळे या स्पर्धेचा सलग आठव्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संजय घोडावत स्कूलला मिळाला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या राहण्याची व जेवणाची उत्कृष्ट सोय करण्यात आलेली आहे. सीबीएसईने नियुक्त केलेले पंच व निरीक्षक स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित असणार आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि 27 ऑक्टोबर रोजी सीबीएसई चे पुणे विभागप्रमुख श्री. राम वीर, कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री एकनाथ आंबोकर, एशियन अंडर 20 ॲथलेटिक चॅम्पियन रिया नितीन पाटील यांच्या उपस्थित सकाळी नऊ वाजता होणार आहे. 14, 17 व 19 या वयोगटात मुले व मुली अशा गटात या सर्व स्पर्धा पार पडतील. खेळाडूंसाठी मैदानाचे ही उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. चेअरमन श्री संजय घोडावत यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शना व सहकार्याबद्दल त्यांचेही आभार सस्मिता मोहंती यांनी मानले. या पत्रकार परिषदेसाठी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन, प्राचार्य श्री सॅमसन, उपप्राचार्य श्री अस्कर अली हे उपस्थित होते.