अभाअनिच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. राजीव बिले यांची निवड

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्गची सभा राष्ट्रीय उपाध्यक्ष मान .रवींद्र खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली . या सभेमध्ये जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते . या सभेमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख सचिन हिंदळेकर, जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण उपस्थित होते . यामध्ये जिल्हा कार्यकारीणीची सर्वानुमते निवड करण्यात आली .अँड. राजीव बिले यांची जिल्हाअध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली . याशिवाय इतर कार्यकारीणी पुढील प्रमाणे
जिल्हासंघटक . विजय चौकेकर
सहसंघटक – समीर साळकर, उपाध्यक्ष – कुडाळवेंगुर्ला- -संजीव लिंगवत सावंतवाडी दोडामार्ग -वसंत जाधव ,
कणकवली_ वैभववाडी -आनंद धामापूरकर,
मालवण_ देवगड – अजित कांबळे,
कार्याध्यक्ष . – अनिल चव्हाण,
सहकार्याध्यक्ष -महेंद्र कदम, जिल्हासचिव – अजित कानशिंगे,
सहसचिव -संजय खोटलेकर, खजिनदार – जयराम डांमरे,
सहखजिनदार – श्रीवदन आरोसकर,
जिल्हायुवा संघटक – यशवर्धन राणे,
सहयुवासंघटक – सहदेव पाटकर,
जिल्हा संघटिका –
रुपाली पाटील,
तालुका संपर्कप्रमुख
मालवण – विजय लिंगायत
वेंगुर्ला – स्मिता गावडे . सावंतवाडी – फिलिक्स फर्नांडिस,
मार्गदर्शक –
आनंद जाधव, सतीश पवार, विजय शेट्टी,
प्रसिद्धी प्रमुख
नागेश दुखंडे.
सदस्य
अनिल कदम,सुरेश पवार,प्रभाकर चव्हाण,अनुश्री चव्हाण,
आदींची कार्यकारीणीत निवड करण्यात आली .
अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना
ॲ ड . राजीव बिले म्हणाले की
मी पहिल्यापासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जिल्हयात करीत असून अनेक स्मशानामध्ये भूतांचा शोध घेण्यासाठी रात्री अपरात्री फिरलो आहे.
आता जिल्हयाची सुत्रे हातात दिल्याने माझी जबाबदारी आणखी वाढली असून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम जिल्ह्यामध्ये जोमाने सूरू करून खेड्यापाड्यातील जनतेचा मनामनातली अंधश्रद्धा दूर करून सर्वसामान्य लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा आणि बुवा, बाबा, बाया, मांत्रिक, देवी, भगत यांचे पासून त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रबोधनासाठी गावागावात व्याख्यान आयोजित करूया . आणि जिल्ह्यामध्ये पुढील काळात एकही केस जादूटोणा विरोधी कायदयाअंतर्गत दाखलच होणार नाही एवढे जिल्ह्यात वातावरण निर्माण करून जिल्हयाचे कामकाज राज्यात एक नंबर राहील असे प्रयत्न करेन .
यावेळी उपस्थितांना नियुक्त प्रमाणपत्रे रविंद्र खानविलकर . सचिन हिंदळेकर , राजीव बिले . विजय चौकेकर, अनिल चव्हाण, यांच्या हस्ते देण्यात आली .
सभेचे संपूर्ण आयोजन नियोजन विजय चौकेकर व त्यांच्या सर्व कार्यकारीणी सदस्यांनी केले . यावेळी संभाजी कोरे, प्रमोद कासले, राजाराम चव्हाण, कल्याण कदम, संतोष कदम, दीपक जाधव, भाऊ गोसावी, श्रद्धा कदम, संतोष कांबळे , दशरथ सावंत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .
शेवटी माजी जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर यांनी सर्वांचेआभार मानले .

कणकवली (प्रतिनिधी)

error: Content is protected !!