खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील ब्राम्हणदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

भाजपा आमदार नितेशजी राणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील श्री ब्राम्हणदेव मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन शुभारंभ आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप कार्यकर्ते श्री संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,भाजप कार्यकर्ते मिलिंद मेस्त्री,माजी महिला बालकल्याण सभापती श्रीम.रत्नप्रभा वळंजू,खारेपाटण विभाग भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच वीरेंद्र चिके, खारेपाटण गट विकास सोसायटीचे संचालक श्रीधर गुरव,संभाजीनगर गुरववाडी विकास मंडळ खारेपाटण (रजि.)मुंबई या मंडळाचे अध्यक्ष श्री सूर्यकांत गुरव,विजय गुरव,मनोहर गुरव,विजय सावंत,संकेत गुरव व गुरव ग्रामस्थ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील ग्रामस्थांनी श्री सुहास गुरव घर ते ब्राम्हण देव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी मागणी केली होती. भारतीय जनता पार्टीचे कणकवली/देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी याबाबत काही दिवसापूर्वी संभाजी नगर गुरववाडी येथील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना रस्ता पूर्ण करून.देन्याबाबत आश्वासन दिले होते.अखेर या रस्त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सुमारे ३० लाख रुपये एवढा मोठा निधी मंजुर केला. संभाजी नगर गुरववाडी विकास मंडळाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!