देवगड तालुक्यातील ठाकुरवाडी ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे निर्विवाद वर्चस्व

आमदार नितेश राणेंचा देवगड मध्ये करिष्मा कायम

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली खाते उघडले असून आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघावरील करिष्मा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. देवगड तालुक्यातील ठाकूरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदासहीत ५ सदस्य बिनविरोध झाले आहेत.
सरपंचपदी भाजपाच्या अनिका कादिर मंचेकर यांची निवड झाली. यावेळी भाजपाचे बाळ खडपे, तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली,माजी सभापती संजय बोंबडी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, कादिर मंचेकर, रामकृष्ण जुवाटकर आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!