खारेपाटण मध्ये साडेचार लाखांची दारू हस्तगत

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची धडक कारवाई
खारेपाटण येथे गोवा बनावटीची अनधिकृत दारू विक्री करत असल्या प्रकरणी किशोर अंकुश निग्रे 38 खारेपाटण कोष्टी आळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या घराच्या मागील पडवीतून सुमारे 4 लाख 45 हजार 800 रुपयांची गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत प्रमोद काळसेकर यांनी खबर दिली असून, पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके राजु जामसांडेकर श्री. खंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कणकवली प्रतिनिधी




