जुबीन नौटियाल यांच्या गाण्याच्या तालावर हजारो तरुणाई थिरकली…

अडीच तासाच्या कार्यक्रमाला तरुणाईचा जोरदार प्रतिसाद….
सावंतवाडी : सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर काल रात्री सुप्रसिद्ध गायक, संगीतकार जुबीन नौटियाल यांचा लाईव्ह शो कार्यक्रमाने तब्बल अडीच तास उपस्थित तरुणाईला वेड लावले. जुबीन नौटियाल यांनी आपल्या गायनाने, वाद्यवृंदाने आणि आपल्या अप्रतिम स्वराने तरुणाईला थीरकायला भाग पाडले. जुबीनच्या प्रत्येक गाण्याच्या तालावर उपस्थित युवक युवतींनी जोरदार प्रतिसाद देत होती.
यावेळी सावंतवाडी जिमखाना मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. विशेषता युवक आणि युवतींची संख्या लक्षणीय होती.
आपल्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांनी या शोचे आयोजन केले होते. सुंदर आयोजन आणि नियोजना बद्दल उपस्थित हजारो तरुणाईने विशाल परब आणि त्यांच्या आयोजन समितीला धन्यवाद दिले. विशाल परब यांनी दरवर्षी वाढदिवसानिमित्त अशाच कार्यक्रमांचे आयोजन करावेत, अशी विनंतीही केली.
दरम्यान विशाल परब यांनी तरुणाईला पुढील वर्षी यापेक्षा अधिक दर्जेदार कार्यक्रम करण्याचा आपला मानस असल्याचे सांगीतले. आपण युवकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीला पोषक अशा कार्यक्रमाचे आयोजनासाठी कटिबद्ध असल्याचे विशाल परब म्हणाले.





