महामार्गाला प्रा. मधु दंडवते नाव द्या!

कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते स्मारक समितीच्या वतीने कणकवली रेल्वे स्टेशन मास्तर यांना निवेदन

सिंधुदुर्ग कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. दंडवते यांचे कोकण रेल्वे निर्माण करण्यात मोठे ऋण आहे. दऱ्याखोऱ्यातून कोकण रेल्वेचे स्वप्न साकारण्याच्या कार्याने ते लोक जीवनात अजरामर झाले आहेत.
कोकण रेल्वेने प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृति जागृत ठेवाव्यात म्हणून रत्नागिरी येथे प्रा. मधु दंडवते स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. या स्मारक समितीच्या वतीने कोकण रेल्वेच्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्थानकावर त्या त्या जिल्ह्यातील प्रा. मधु दंडवते प्रेमींच्या वतीने एकूण पाच मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
१) रत्नागिरी रेल्वे स्टेशन प्रवासी बैठक असलेल्या व्यवस्थेच्या जागी भिंतीवर प्रा. मधु दंडवते यांचे तैलचित्र लावण्यात यावे.
२) रत्नागिरी रेल्वे स्थानक ते महामार्ग रस्त्याला प्रा. मधु दंडवते रस्ता असे नाव देण्यात यावे. ३)सावंतवाडी स्थानकाला टर्मिनस म्हणून जाहीर करून कार्यान्वित करावे.
४) रत्नागिरी रेल्वे स्थानकाला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे. ५) प्रा. मधु दंडवते यांच्या नावाने रेल्वे सुरू करावी किंवा एका विद्यमान रेल्वे गाडीचे नामकरण करावे.
या मागण्या २६, जानेवारी २०२४ पर्यंत या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
‌. कणकवली स्थानकात निवेदन देण्यासाठी निमंत्रक डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्या सहित कणकवलीतील विनायक उर्फ बाळू मेस्त्री, डॉ. सोमनाथ कदम, महानंद चव्हाण, चंद्रकांत पवार, निलेश शिरवलकर, विजय फोंडेकर, संतोष जाधव व गोपुरी आश्रमाचे कार्यकर्ते सदाशिव उर्फ बाबू राणे आदी दंडवते प्रेमी उपस्थित होते होते.

error: Content is protected !!