शिवसेना ठाकरे गट नाटळ हरकुळ विभागीय कार्यालयाच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन

विविध कार्यक्रमांची रेलचेल

कणकवली शिवसेना ठाकरे गट नाटळ हरकुळ विभागीय शाखा कनेडी च्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 15 ते 24 ऑक्टोबर पर्यंत यानिमित्ताने विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. 15 ते 17 ऑक्टोंबर पर्यंत रात्री 9 वाजता स्थानीक दांडिया. 18 ऑक्टोंबर रोजी रात्री 7 वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा, या स्पर्धेकरता विविध पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेच्या करिता संपर्कासाठी बेनी डिसोझा यांच्याशी संपर्क साधावा. गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा याकरिता संदीप गावकर यांच्याशी संपर्क साधावा. शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता हरिपाठ, दत्तगुरु प्रसादीक हरिपाठ सेवा मंडळ दिगवळे. रात्री 9 वाजता स्थानिक दांडिया. शनिवार 21 ऑक्टोबर रोजी 7 वाजता पैठणी स्पर्धा, त्याकरिता प्रथम पारितोषिक सोन्याची नथ व पैठणी, द्वितीय व तृतीय पैठणी. या स्पर्धेच्या माहितीकरिता अंजली सापळे, वैशाली वाळके यांच्याशी संपर्क साधावा. रविवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कुमारीका पूजन, या संदर्भात अंजली सापळे, अरुणा सावंत, जयश्री सावंत संपर्क, त्यानंतर सकाळी 10 वाजता डबलबारी भजन, बुवा सतीश सावंत विरुद्ध बुवा दिलीप गोसावी यांच्यात होणार आहे. रात्री 9 वाजता स्थानिक दांडिया. सोमवारी 23 ऑक्टोबर रोजी दांडिया, मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी दांडिया व प्रमुख आकर्षण निमंत्रण दांडिया होणार आहे. उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना सादरीकरण करणाऱ्यांना रोज 20 आकर्षक बक्षिसे देखील दिली जाणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी केले आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!