प्रशिक्षण घेऊन विकासाची गंगा आणूया – अमोल पाठक

कुडाळ मध्ये ‘आमचा गाव आमचा विकास’ अंतर्गत प्रशिक्षण

निलेश जोशी । कुडाळ : विकास प्रशासनातील आयडॉल म्हणून कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची ख्याती आहे आज विकासाशी संबंधित प्रशिक्षण घेऊन विकासाची गंगा अविरतपणे चालवली पाहिजे असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी केले. आमचा गाव आमचा आमचा विकास आराखडा कार्यक्रमात ते आज बोलत होते.
  कुडाळ पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत खाते प्रमुख, प्रविण प्रशिक्षक प्रभारी अधिकारी यांचे प्रशिक्षण आमचा गाव आमचा विकास आराखडा कार्यक्रमाचे आयोजन येथील महालक्ष्मी सभागृहात करण्यात आले होते. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार श्री पाठक, पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला, गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, मुकेश सजवाने, प्रशिक्षक व माजी सरपंच दादा साईल, माजी उपसभापती जयभारत पालव, सरपंच राजन परब, अजय आकेरकर, आर डी जंगले, संजय ओरोसकर, गणेश राठोड, एकात्मिक प्रकल्प अधिकारी गीता चेदवणकर, दिनकर तळवणेकर, सोनाली पालव, सतीश साळगावकर, रांगणातुळसुळी माजी सरपंच नागेश आईर, मिलिंद नाईक, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब, के टी चव्हाण, स्वप्नाली सावंत, आरती पाटील, सरपच कावेरी चव्हाण, रामदास चव्हाण, संतोष पालव, अरविंद परब, कुडाळ तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक प्रशिक्षणार्थी, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   यावेळी बोलताना तहसीलदार श्री पाठक म्हणाले, आपल्या गावाचा विकास करायचा असल्यास प्रशिक्षण ही काळाची गरज आहे, वेळोवेळी बदलणारे शासकीय निर्णय त्यामुळे गावाच्या विकासात येणाऱ्या समस्या पाहता प्रशिक्षण काळाची गरज आहे . प्रशासनातील आयडॉल म्हणजे कुडाळ तालुका गट विकास अधिकारी विजय चव्हाण आहेत, त्यांनी कुडाळ पंचायत समितीला राज्यपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त करून दिले आहेत. त्यामुळे विजय चव्हाण हे खऱ्या अर्थाने कुडाळ तालुक्याच्या प्रशासनातील आयडॉल आहेत.
पोलिस निरीक्षक श्रीमती मुल्ला म्हणाल्या, कुडाळ तालुका सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहेत आणि या प्रगतीचे शिल्पकार गटविकास अधिकारी विजय चव्हाण आहेत. त्यानी आपला कुडाळ तालुका विविध योजनांमध्ये राज्याच्या पटलावर नेला आहे हे निश्चितच सर्वासाठी अभिमानास्पद आहे असे सांगितले. गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आमचा गाव आमचा विकास आराखड्याबाबत नियोजनबध्द चर्चा झाली पाहिजे विकासाचा आराखडा करताना खर्च का होत नाही याबाबत सविस्तर चर्चा झाली पाहिजे असे सांगितले.
कुडाळ तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांना प्रशिक्षक दादा साईल आरती पाटील यांनी आपला गाव आपला विकास प्रशिक्षणांतर्गत गाव आराखडा तयार करणे, विकास कामांची निवड करणे, खर्चाचे नियोजन करणे, ग्रामसभांचे नियोजन करताना समाजातील इतर घटकांना समाविष्ट करणे याबाबत प्रशिक्षण दिले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!