राष्ट्रवादीत झालेल्या फुटीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही परिणाम नाही

माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी सावंतवाडी ठिकाणी पत्रकार परिषदेत दिली माहिती
शासनाचा अंकुश नसल्यामुळे अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रकार वाढले
सावंतवाडी सध्या राष्ट्रवादीत झालेल्या फुटीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही परिणामझालेला नाही. या जिल्ह्यातील अबिद नाईक यांच्या सारखे जे गेले ते कधी पक्षात न दिसणारे असे होते. त्यामुळे ते जाण्याने फरक पडणार नाही अशी खरमरीत टिका राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सावंतवाडी येते बोलतांना माहीती दिली . आगामी काळात विधानसभेच्या किती जागा लढवाव्यात याचा निर्णय महायुती म्हणून घेण्यात येणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात अर्चना घारेंना उमेदवारी देण्यात येणारं का? विचारले असता प्रदेशाध्यक्षांनी सांगितले म्हणजे “फायनल”, असे सांगून सगळच थेट बोलायचं नसतं, असे ते यावेळी बोलले श्री. पाटील यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलले, यावेळी
त्यांनी शासनाचा धोरणावरजोरदार टिका केली. शासनाचा अंकुश
नसल्यामुळे अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रकार वाढले आहेत. सावंतवाडीत घडलेला प्रकार त्याचेच उदाहरण आहे . त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्यानिवडणुका होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसल, जिल्हाध्यक्ष अमित सामंत,माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, महिला कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे, प्रसाद रेगे भास्कर परब, अनंत पिळणकर आदी उपस्थित होते