खारेपाटण सब स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर ने घेतला पेट

जवळपास जिल्ह्यातील विद्युत पुरवठा झाला होता खंडित
रात्री उशिरा विद्युत पुरवठा सुरळीत
खारेपाटण येथील महापारेषण च्या सब स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर फुटून त्याने पेट घेतल्याने रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जवळपास संपूर्ण जिल्ह्यातील वीज पुरवठा ठप्प झाला. सब स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर हा अचानक पेटल्याने तेथील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र काही वेळातच या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर खंडित झालेला वीज पुरवठा काही वेळातच कणकवली साठी राधानगरी फिडर लाईन वरून सुरू करण्यात आला. व त्यानंतर आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवल्यावर रात्री 9.30 दरम्यान सब स्टेशन मधील दुसऱ्या पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरू करण्यात आला. याबाबत घटनेची माहिती कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी घेतली असून तांत्रिक कारणामुळे या ट्रान्सफार्मर ने पेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान काल वर्ल्ड कप क्रिकेट सामना सुरू असण्याच्या कालावधीत वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली