सिंधुदुर्ग मधील एसटीची स्लीपर (शयनयान) प्रवास सेवा सुरू

प्रवाशांना नियमित तिकीट दरामध्येच मिळणार स्लीपर सेवा
महिला व ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरात 50 टक्के सवलत
विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांची माहिती
सिंधुदूर्गात जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांकरिता राज्य परिवहन विभागाची बसची सिंधुदुर्ग विभागातून मुंबई बोरिवली, कोल्हापुर लातूर मार्गावर खाजगी वाहतुकदारांमार्फत शयनआसनी सेवा सुरू करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात खाजगी वाहतुकदार प्रवाशी तिकिटात वाढ करून प्रवाशांची लुबाडनुक करतात.खाजगी वाहतुकदारांच्या शयनयान बसेसच्या स्पर्धेत प्रथमच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची विना वातानुकूलित शयनयान बससेवा चालु करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार सिंधुदूर्ग विभागास एकुण ०६ नविन विना वातानुकूलित शयनयान बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली.सिंधुदूर्ग विभागाला प्रथमच ०६ शयन आसनी बसेस प्रवाशांच्या सोयीकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सदर बसेस खालीलप्रमाणे मार्गावर धावणार आहेत. 1) बांदा कुडाळ-चिपळूण-बोरिवली, सदर बसचा मार्ग चांदा-सावंतवाडी-कुडाळ-सिंधुदूर्गगनरी कसाल-कणकवली- तरळा खारेपाटण राजापुर-चिपळूण- पनवेल- कुर्ला नेहरुनगर – सायन- अंधेरी मार्गे बोरिवली नॅन्सी कॉलनी पर्यंत जाईल. सदर बस परतीकरितादेखील याच मार्गावरुन येईल. सदर बसच्या थांब्याच्या वेळ व तिकिट देखील निश्चित करण्यात आले आहे. तसेच बांदा – सावंतवाडी-फोंडा कोल्हापुर-मुंबई सदर बसचा मार्ग बांदा सावंतवाडी, कुडाळ- सिंधुदूर्गगनरी, कसाल – कणकवली- फोंडा-राधानगरी-कोल्हापुर स्वारगेट- निगडी-लोणावळा पनवेल- कुर्ला नेहरूनगर- परळ- मुंबई सेंट्रल पर्यंत जाईल. सदर बस परतीकरितादेखील याच मार्गावरुन येईल. त्यानंतर बांदा – कणकवली- फोंडा पंढरपुर-तुळजापुर- लातुर सदर बसचा मार्ग बांदा-सावंतवाडी कुडाळ- सिंधुदुर्गगनरी कसाल- कणकवली – फोंडा- राधानगरी-कोल्हापुर-मिरज- सांगोला- पंढरपुर- सोलापुर-तुळजापुर- औसा- लातुर पर्यंत जाईल. सदर बस परतीकरितादेखील याच मार्गावरुन येईल,सदर बस प्रामुख्याने कोल्हापुर पंढरपुर, तुळजापुर या तीर्थस्थळावरील बसस्थानकावरुन जाणार आहे. या मुळे जे प्रवाशी सदर तीर्थस्थळांकरिता प्रवास करतात त्यांना फायदा होणार आहे. त्याच बरोबर शिक्षक, जिल्हा परिषद इतर कार्यालयातील बहुतेक कर्मचारी वर्ग हा पंढरपुर, सोलापुर, तुळजापुर, लातुर या भागातील असल्याने त्यांना देखील या बसचा फायदा होणार आहे.
सदर बस ही विना वातानुकूलित असुन टाटाच्या बीएस 6 प्रकारातील असुन बसमध्ये ३० शयन आसने (स्लीपरसीट) उपलब्ध आहेत. आहेत सदरच्या बसचे सस्पेंशन अत्यंत सुंदर असुन प्रवास हा आरामदायी होईल. त्याचबरोबर सदर बसेसना व्हेईकल ट्रेकिंग डिव्हाइस उपलब्ध असुन रा प च्या या एप्लिकेशनवरुन सदरच्या बसची स्थिती प्रवाशास जाणुन घेणे सोपे जाईल. बसमध्ये लगेज बॉक्स बसव्यतिरिक्त प्रवाशांच्या किरकोळ सामानाकरिता छोटे कॅरियर प्रत्येक आसनावर देण्यात आलेले आहेत. चार्जिंग पॉईंट, रिडींग लाईट प्रत्येक शयनाकरिता उपलब्ध केलेल्या आहेत. सदर बसचे आरक्षण हे रा प च्या आरक्षण केंद्राव्यतिरिक्त प्रवाशी स्वता देखील ऑनलाईन public.msrtcors.com या लिंकव्दारे किंवा MSRTC Mobile App व्दारे देखील करु शकतात. सदर बसमध्ये महिला प्रवाशी व 65 वर्षावरील व्यक्तिना (ज्येष्ठ नागरिक) तिकिट दरात 50 टक्के सवलत देण्यात आलेली आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तिस 100 टक्के सवलत म्हणजेच मोफत प्रवासच उपलब्ध होईल त्यामुळे सदर बस चालनात आल्याने वरील मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अत्यंत चांगली सोय होईल. तरी रा.प. सेवेचे लाभ घेण्याचे आवाहन अभिजित पाटील, विभाग नियंत्रक, रा.प सिंधुदुर्ग विभाग यांनी केले आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली