कणकवली पटवर्धन चौकात ठाकरे गटाच्या बॅनर ला भाजपाच्या बॅनर ने उत्तर

पटवर्धन चौकात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त

ठाकरे गटासह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा

भाजपा कार्यकर्ते पटवर्धन चौकात प्रश्न विचारण्यासाठी येणार का? याची सर्वांना उत्सुकता

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या होऊ दे चर्चा विचारा प्रश्न या कार्यक्रमाच्या दरम्यान कणकवलीत पटवर्धन चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. एकीकडे मालवण मध्ये ठाकरे गटाचे व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्या पार्श्वभूमीवर कणकवलीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. त्याच सोबत ज्या ठिकाणी पटवर्धन चौकात हा कार्यक्रम घेतला जाणार आहे त्या पटवर्धन चौकात युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लावलेल्या बॅनरच्या काही अंतरावर भारतीय जनता पार्टी कणकवलीच्या वतीने चर्चा होऊ देतच आमचा आमदार कामगिरी दमदार, बोलून नाही तर करून दाखवतो. अशा आशयाचे बॅनर लावला आहे. यामध्ये आमदार नितेश राणे यांनी 2 हजार 217.89 कोटींचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणल्याचे बॅनर मध्ये म्हटले आहे. तर सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे हे त्या 10 प्रश्नांची उत्तरे देतील का? असे विचारत दहा प्रश्न बॅनर द्वारे उपस्थित केले आहेत. एकूणच कणकवलीत यापूर्वी राड्याला राड्याने उत्तर ही संस्कृती आता काहीशी बदलत चालली असून, आता गांधीगिरी चा भाग म्हणून बॅनरला बॅनर ने उत्तर अशी पद्धत अवलंबल्याचे दिसून येत आहे. एकूणच काही वेळात हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाच्या दरम्यान भाजपा कार्यकर्ते पटवर्धन चौकात या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी येणार का? त्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. तसेच या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शिवसेना ठाकरे गटासह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम 149 अंतर्गत नोतीस बजावल्या आहेत. एकूणच या कार्यक्रमाची उत्सुकता ताणली गेली आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!