कणकवली ठाकरे गटाच्या सभेच्या ठिकाणी लिंबू व मिरची

कणकवली पटवर्धन चौकातील बांधलेल्या लिंबू मिरचीच्या प्रकाराची चर्चा
कणकवली आज पटवर्धन चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या मार्फत होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असताना या कॉर्नर सभा स्थळाच्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज वरून पटवर्धन चौकात लिंबू व मिरची लटकवल्याचे आढळून आले. त्यामुळे या घटनेची चर्चा कणकवलीत सुरू आहे. पटवर्धन चौकात या लिंबू मिरचीचा खेळ नेमका कोणी केला? या लिंबू मिरचीच्या खेळामधली कारणे काय? एकीकडे निवडणुकीच्या वेळी देव देवस्की चे प्रकार घडत असताना आता सभेच्या दरम्यान बांधलेले लिंबू मिरचीने राजकारणात गजालीना उत आला आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली