कै.आबा मुंज यांना घावनळेत दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली

  • घावनळे पंचक्रोशीचे सर्वेसर्वा व कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहीलेले दिवंगत नेते आबा मुंज यांच्या दुसऱ्या सृतीदिना निमित्त घावनळे गावात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून आबांच्या
    प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इरशाद शेख, ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, उद्योजक प्रकाश जैतापकर, विजय प्रभू, समीर वंजारी, अभय शिरसाट संतोष मुंज इतर ग्रामस्थ मित्र मंडळी उपस्थित होते.
    यावेळी घावनळे गावा मध्ये भव्य बाईक रॅली काढली. यावेळी आबा मुंज अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी गुरू मुंज वेलफेअर फाउंडेशन ग्रृप, घावनळे यांच्या वतीने घावनळे गावातील एकुण 9 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.
    यावेळी गुरू मुंज वेलफेअर फाउंडेशन ग्रृप, घावनळे चे अध्यक्ष संतोष मुंज, सखाराम खोचरे, नागेश सावंत, महेश पालव, नंदकिशोर घाडीगांवकर, चंद्रकांत पालव, प्रमोद खोचरे, प्रभाकर खोचरे, साई सावंत, बाबली जाधव, चंद्रकांत जाधव, बाबुराव शेळके, शेखर सावंत, निखील तेली, चंद्रकांत झोरे, आनंद झोरे, शेखर पिळणकर, एकनाथ पिळणकर, हनुमंत देसाई, प्रमोद घावनळकर, लक्ष्मण घाडीगांवकर, दिलीप पारकर, सुनील पारकर , विजय आमणेकर, शंकर पालव, उदय लाड, साबाजी घाडीगांवकर, एकनाथ सावंत, नारायण कोचरेकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आबा मुंज यांचे धाकटे बंधु घावनळेचे माजी सरपंच संतोष मुंज यांनी आबांच्या नंतर त्यांचे कार्यकर्ते एकनिष्ठेने आपल्या सोबत राहील्याने त्यांचे जाहीर आभार मानले.
error: Content is protected !!