कणकवलीच्या राजासमोर रंगला “खेळ पैठणीचा”.

जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक बाळू वालावलकर यांनी वाढविली रंगत.
शहरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.
कणकवली/मयुर ठाकूर.
कणकवली ऑटो रिक्षा चालक मालक सार्वजनिक गणेशोत्सव कला, क्रीडा मंडळ कणकवली यांच्या आयोजनाखाली कणकवलीच्या राजाचा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात दरवर्षी साजरा केला जातो.नवसाला पावणारा “कणकवलीचा राजा” अशी या गणपती गजाननाची ओळख आहॆ.21 दिवस या गणरायाची मनोभावे सेवा केली जाते.विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात.त्यामध्ये दशावतारी नाटक,भजन,डबलबाऱ्या अश्या कार्यक्रमांचा सहभाग असतो. नुकताच या कणकवलीच्या राजसमोर होम मिनिस्टर चा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे निवेदन जिल्ह्यात दुसरे आदेश भावोजी म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध निवेदक बाळू वालावलकर यांनी केले.या होम मिनिस्टर ला शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपला सहभाग घेतला.यावेळी l महिलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे खेळ खेळविण्यात आले.यावेळी विविध उखाणे घेत महिलांनी यां कार्यक्रमाचा गोडवा वाढवला.या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत एकही महिला या खेळातून बाद होणार नाही अस नियोजन करण्यात आलं होत.परंतु प्रत्येक फेरीच्या गुणांकनानुसार विजेता स्पर्धक हा ठरवला जाईल अश्या प्रकारचा हा होम मिनिस्टर जिल्ह्यात प्रथमच कणकवलीच्या राजसमोर संपन्न होत आहॆ.शहरवासियांनी मोठा प्रतिसाद होम मिनिस्टर च्या यां कार्यक्रमाला दिला असून उत्साहाच वातावरण कणकवलीच्या राजसमोर तयार झाले आहॆ.