राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा परब

महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान
सिंधुदुर्ग राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. प्रज्ञा परब यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष सौ रुपाली चाकणकर यांनी नियुक्ति केली. त्यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे सौ. प्रज्ञा परब यांना महिला जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र दिले. सोबत सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कूड़ाळकर, राष्ट्रवादी नेते एम. के.गावड़े, राष्ट्रवादी जिल्हा सरचीटणीस, सावळाराम अणावकर, प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे, कुडाळ राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष पूजा पेड़णेकर,राष्ट्रवादी देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान, राष्ट्रवादी कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के. सावंत, राष्ट्रवादी ओ. बी. सी. जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे,जिल्हा प्रतिनिधि केदार खोत राष्ट्रवादी जेष्ट नेते मनोहर साटम,राष्ट्रवादी नेते अविनाश चमणकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी